महाराष्ट्र पुणे

“शेती हवामानावर अवलंबून असते, सरकारने शेतकऱ्यांना मदती करणं गरजेचं”

Sharad Pawar1

सातारा | शेती हवामानावर अवलंबून असल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अखेरचा तोडगा नाही. कर्जमाफीमुळे नियमित कर्जदारांवर अन्याय होतो. शिवाय चुकीचा पायंडाही पडतो, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

सातारा जिल्ह्या बँकेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं एकत्रित सरकार आहे. सरकार तिघे चालवत असले तरी सर्व पक्षांमध्ये समन्वय आहे. राज्याच्या दृष्टीने हे चांगले दिशादर्शक आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकार अस्तित्वात येताच ठाकरे सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात दिड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही; शेलारांच्या वक्तव्यावर आव्हाडांचं टीकास्त्र

-“मी छोट्या आणि मोठ्या भावाच्या कात्रीत सापडलो होतो”

-हिंदुत्वाचं वचन मोडलं जात असेल तर मला असलं हिंदुत्व मला नको- मुख्यमंत्री

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”

-सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही- विक्रम गोखले