आम्ही जे केलं ते भाजपला कधीच जमणार नाही- शरद पवार

पुणे : विधानसभेच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला आम्ही जे केल ते कधाीच जमणार नाही, अशा शब्दात भाजपवर आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मी मुख्यमंत्री असताना राज्यात महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. महिला सबलीकरणासाठी सगळ्या बाजुने काम केलं. राज्यात सत्तेत असताना महिला धोरण राज्यात यशस्वीपणे राबवले. हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी देशाचा संरक्षण मंत्री असताना अमेरिकेत जाण्याचा योग आला होता. त्याठिकाणी महिला सैन्यदलात असल्याचे पाहिले. त्यानंतर आपल्या देशात देखील सैन्यामध्ये महिलांना संधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसची महिलांना न्याय देण्याची भूमिका होती. पण आताच्या सरकारची महिलांना न्या देण्याची भूमिका नाहीये, असं पवार म्हणाले.

भाजप सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केंद्र सरकारने श्रीमंतांचे कर्ज माफ करून त्यांचे 82 हजार कोटींचे कर्ज फेडले. पण संपूर्ण देशात शेतीची अवस्था बिकट आहे हे या राज्यकर्त्यांच्या नजरेत कसे येत नाही? असा सवलाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द पवारांनी दिला. 

 

महत्वाच्या बातम्या-