एल्गार परिषदेच्या तपासासंदर्भात शरद पवार म्हणतात…

मुंबई | एल्गार परिषदेच्या खटल्याचा तपास एनआयकडे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही राज्य सरकारला एसआयटी नेमून देण्याचा अधिकार एनआयएच्या कायद्यातील कलम 10 मध्ये आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते सोमवारी बोलत होते. त्यावर

कलम 10 नुसार समांतर चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, कायदेशीर सल्ल्यानंतर एसआयटी चौकशीबाबत निर्णय घेऊ, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

केंद्राने सरकारने एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे असला तरी याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असा सर्वांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण त्याबाबत चर्चा करू, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी मुंबईत घेतली. एल्गारचा तपास एनआयएकडे देण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद असल्याचंही समोर आल्याचा मुद्दा उपस्थित केला. पवारांनी या बैठकीत एनआयएच्या कायद्यातील कलम 10 आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही सांगून, राज्य सरकारही या प्रकरणाचा तपास करु शकते, असं स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-कडक सॅल्यूट… भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!

-“महाराज कीर्तनातून नेहमी चांगले उपदेश देतात, त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही”

-इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही- रूपाली पाटील

-महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे

तृप्ती देसाईंवर टीका करणाऱ्या इंदुरीकर भक्तांचा किशोरी शहाणेंनी घेतला खरपूस समाचार!