महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला; शरद पवारांनी ट्वीटरवरुन वाहिली श्रद्धांजली

मुंबई | डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी श्रीराम लागू यांचं निधन झालं आहे. नाट्य आणि सिनेसृष्टीची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर कला, राजकारण, क्रीडा विश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर होता. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनानं महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी श्रीराम लागू यांनी आदरांजली वाहिली आहे.

मराठी रंगभूमीनं लाडका नटसम्राट गमावला आहे. झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना ट्वीटद्वारे श्रद्धांजली वाहिली, असं शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, डॉ. श्रीरीम लागू यांनी ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली.

 

महत्वाच्या बातम्या-