“आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती”

मुंबई | उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर आरोपींनी हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. पीडितेवर चाकूने वार करून आरोपींनी तिला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडिता 80 टक्के भाजली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी ट्विट करून यासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच उन्नावमधील सामूहिक बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडित तरुणीला जिवंत जाळल्याची घटना ऐकून धक्का बसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पीडिता सध्या मृत्युशी झुंज देत आहे. जर आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पिडितेवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-