‘संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करू?’, शरद पवारांचा सवाल

मुंबई | शिवसेनेचे धडाडती तोफ आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटवरुन त्यांनी शिंदेंना चांगलेच धारेवर धरले.

त्यांच्या या सरकार पडण्याच्या दाव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले.

शरद पवारांनी राऊतांच्या दाव्यावर थेट उत्तर देणे टाळले. त्यांनी संजय राऊतांचे नाव न घेता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा असे सांगितले. मी काय सांगू? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्ररकारांना केला. तसेच पुढे ते म्हणाले, संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करु?

संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत एक गौप्यस्फोट करुन धमाल उडवून दिली होती. भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही, असे भाकीत संजय राऊतांनी केले होते.

शरद पवारांनी लांबलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांवर भाष्य केले. त्यांनी राज्यात नवीन सरकारला 1 महिना होत आला, तरी अजून खाते वाटप नाही यावरुन कात्रीत धरले.

राज्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”