“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”

उस्मानाबाद | संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे, असंही पवार म्हणालेत.

चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष सुरु आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे, जेव्हा डॉक्टर होण्याची वेळ येते तेव्हा लोक युक्रेन सारख्या देशात जातात तेथे आपली हजारो मुलं आहेत. आठ आठ दिवसांपासून ते भुयारात बसलेत, बाहेर पडता येत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस 

  Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

  पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर

  “ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”