शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार? गृहमंत्री रोखठोक उत्तर देत म्हणाले…

मुंबई | अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारला सतत टार्गेट करत आहेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीसह शरद पवारांवर घणाघात केला होता.

जर राज्यात केव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शरद पवार अजित दादांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची नेमकी काय आहे? काहीही कर्तुत्व नसताना उंची नसताना ते बोलत असतात. त्यांनी आधी आपली उंची काय आहे ते पाहावं. ते मोठ मोठ्या नेत्यांबाबत असंच काहीसं बोलून आपली उंची वाढवत असतात, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला आहे.

कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारने चांगलं काम केलं आहे. ही आमची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्ष टिकेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावे, असाही टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेद्वार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील इस्लामपूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना शरद पवारांवर टीका केली होती.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात मी कोथरूडमध्ये अडकलो होतो. त्यामुळे मला इस्लामपुरात जास्त लक्ष देता आलं नाही. मी जर इस्लामपुरात गेलो असतो तर जयंत पाटील यांची सुट्टी केली असती. मग ते केवळ तालुक्याचे नेते राहिले असते, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला होता.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे आणि भाजप हा सामान्य लोकांचा पक्ष आहे, असंही पाटील यांनी यावेळी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या याच टीकेला आता अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ट्विंकलने न.शेत सलमान सोबत केलं ‘ते’ कृत्य, अक्षय कुमारला समजताच त्याने रागात सलमानला…

राष्ट्रवादीला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या ‘या’ लोकप्रिय आमदाराचं नि.धन

अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी

‘माझ्यावर वि.षप्रयोग करणारी ती…’; लता मंगेशकर यांचा धक्कादायक आरोप!

अबब!!! सोन्याचे भाव तब्बल 8 हजार रुपयांनी कोसळले; पाहा आजचे सोन्याचे दर