शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी मोदीं कोणत्या ‘दोन’ अटी ठेवल्या होत्या?

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे एकत्रित सरकार आले आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दोन अटी ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती मिळत आहे. यासंबंधीचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहेत.

भाजपसोबत जाण्यासाठी नरेंद्र मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्री करावं आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी इतर कोणाला मुख्यमंत्री करण्यात यावं, या दोन मागण्या शरद पवारांनी मोदींकडे केल्याचं कळत आहे.

पंतप्रधान मोदींनी या दोन्ही अटी अमान्य केल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं एक वेगळं समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-