मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार यांची जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा त्यांना समन्स बजावण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत चौकशीसाठी बोलावण्यात येत नाही तोपर्यंत येऊ नये, अशी विनंती ईडीने शरद पवार यांना केल्याची माहिती आहे.
शरद पवार मात्र ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.
शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
दरम्यान, ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडलं जाईल, अशीही माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
तेजस ठाकरेंनी सापाची नवी प्रजाती शोधली- https://t.co/cw75KuFTev #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
विधानसभेला अमित देशमुखांना ‘या’ दोन नेत्यांचे कडवे आव्हान – https://t.co/xDrvumBs9m @AmitV_Deshmukh @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
शरद पवार आज ईडी कार्यालयात हजर होणार; मुंबईत जमावबंदीचे आदेश- https://t.co/E5woCqV6kL @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019