कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा

नवी दिल्ली | कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारताला जागतिक बँकेनं मोठा दिलासा आहे. जागतिक बँकेनं सरकारच्या योजनांसाठी 1 बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज सामाजिक सुरक्षेसाठी असेल, असं बँकेनं म्हटलं आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी याआधी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेनं एक अब्ज डॉलरचा आपत्कालीन निधी जाहीर केला होता.

जागतिक बँकेनं मुख्यत: शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी मदत जाहीर केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्यानं लाखो मजूर त्यांच्या गावाकडे परतत असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी जागतिक बँकेनं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे.

सरकारच्या 400 हून अधिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन

-दारु पाजून महसूल मिळवण्यापेक्षा देवस्थानांचं सोनं सरकारनं व्याजानं घ्यावं- तृप्ती देसाई

-पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…

-सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स

-बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…