महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई | राज्याच्या पोलीस खात्यावरचा अधिक भार लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिसांच्या व्यथा मांडणारं पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलं आहे. बंदोबस्तावेळी महिला पोलीस तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेत त्यांनी पत्राद्वारे पोलिसांच्या अडचणी गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत.

सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवं. मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असं निरीक्षण पवारांनी पत्रात मांडलं आहे. तसंच यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत.

सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा असल्याचंही पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राच्या मागणीवर गृहमंत्री अनिल देशमुख काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-खुशखबर…. आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!

-धक्कादायक… महावितरणकडून शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट!

-कुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार

-राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी! आमदार म्हणतात…

-ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या रद्द!