Top news देश

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिलं आहे. कोरोनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा करताना शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याला वाचवा अशा आशयाचं पत्र त्यांनी मोदींना लिहिलं आहे.

केंद्राने 20 लाख कोटींचं पॅकेज जरी जाहीर केलं असलं तरी मी त्यावर काही समाधानी नसल्याचं शरद पवार यांनी पत्रात लिहिलं आहे. केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजममध्ये शेतकऱ्यांसाठी पाहिजे अश्या किंवा आवश्यक त्या ठोस तरतुदी नाहीत, असं पवारांनी म्हटलं आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्याचं लॉकडाऊन आणि कोरोनाने कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मोदींनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक पावले उचलावीत, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

शेतकरी या कोरोनाच्या संकटात पार उन्मळून पडला आहे तेव्हा त्याला अशा काळात धीर देणं गरजेचं आहे. त्याला काही ठोस मदत करणं आपलं कर्तव्य असल्याचं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च

-हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

-माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

-अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

-मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण