नवी दिल्ली | सचिन वाझे आणि गृहमंञी अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंञी अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंञ्यांना पञ दिलं. आणि गृहमंञी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे हे पञ आणि सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्टवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी केला. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंञी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहे, असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंञी उद्धव ठाकरेंली दिलेल्या पञावर परमबीर सिंह यांची स्वाक्षरी नाहीये. तसेच 100 कोटीच्या वसुलीचे पैसे कोणाकडे गेले? याचा देखील उल्लेख त्यामध्ये नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. पञकार परिषद घेण्यापूर्वी त्यांची मुख्यमंञी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे.
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांचा आहे. यावर अजून काही चर्चा झालेली नाही. मुख्यमंञी आमच्या सोबत बोलल्यानंतर पुढचा निर्णय घेईल. तसेच या प्रकरणी मी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांशी अजून चर्चा केली नाही, असं ही पवारांनी स्पष्ट केले आहे.
जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला आले, त्यावेळीचं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे हे पञ समोर आलं. जर पञ द्यायचचं होत, तर परमबीर सिंह यांनी बदली झाल्यानंतर का पञ लिहिलं? आयुक्त पदावर असताना परमबीर सिंह यांनी आरोप को नाही केले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
सचिन वाझे यांनी सेवेत घेण्याचा निर्णय हा गृहमंञी अनिल देशमुखांना घेतला नव्हता. परमबीर सिंह यांनीचं सचिन वाझेंना पदावर घेतलं. दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांसोबत आज बैठक होईल का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे ही बैठक उद्यादेखील होऊ शकते, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, गृहमंञी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल उद्या निर्णय होईल. मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या सोबत उद्या चर्चा करू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
‘रिप्ड जीन्सची सर्वांनाच चिंता या रिप्ड शर्टचं…
‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’…
‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा…