“मी अजित पवारांना…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा मोठा खुलासा

मुंबई | फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला डच्चू देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.

त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकून घेतला आणि महाराष्ट्राला मोठा धक्काच दिला होता. (Morning swearing in Ajit Pawar Devendra Fadnavis)

आता या पहाटेच्या शपथविधीला 2 वर्ष पुर्ण झाली आहेत. या शपथविधीचे अनेक रहस्य अद्याप समोर आले नाहीत. अशातच या शपथविधीमागे शरद पवारांचा हात होता का?, असा सवाल उपस्थित करण्यात येतो.

याच प्रश्नावर आता खुद्द शरद पवारांनी खुलासा केला आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. पहाटेचं सरकार तुमच्या आशीर्वादानेच स्थापन झालेलं का?, असा सवाल शरद पवारांना विचारण्यात आला होता.

“2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाठवलं अशी चर्चा होत असले. हे खरं आहे. त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यावेळी त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांनी यावर दोन कारणं देखील दिली आहेत. फडणवीसांना काही लोकांची कमतरता पडली तर आम्ही त्याचा विचार करू, असं मी दिल्लीत म्हटलं होतं. त्या वक्तव्यामुळे सेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढलं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना नकार देखील दिला होता. मोदींची तशी इच्छा होती, असं शरद पवार म्हणाले आहेत.

त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बैठका झाल्या होत्या. त्यावेळी सदस्यांमध्ये कटुता वाढत होती. त्यामुळे भाजपने अशा प्रकारची चाचपणी केली असावी, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जेवल्यावर लगेचच झोपत असाल तर सावधान! वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका

 दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार

 शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य