Top news महाराष्ट्र मुंबई

UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

sharad pawar e1646045639512
Photo Credit- Facebook/ Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे (UPA) नेतृत्व करावं, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला रोखलं जाऊ शकतं, असं या ठरावात म्हटलं आहे. तसेच यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला काही यूपीएचं नेतृत्व नको आहे. आमच्या तरुणांनी ठराव केला. यूपीएच्या अध्यक्षपदासाठीचा. मला त्यात यत्किंचित रस नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

मी त्यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना सहकार्य शक्ती आणि पाठिंबा आणि मदत या सर्व गोष्टीला माझी तयारी आहे. त्या गोष्टी आम्ही करत असतो, असं शरद पवार म्हणाले.

देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असावा, संसदीय लोकशाहीत असायला हवा. एकच विरोधी पक्ष हवा असेल तर मग ते पुतीन सारखं होईल. रशियाने ठराव केला. चीनने केला. असं पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र बसून विचार करावां. उद्धव ठाकरे आणि मी बैठक बोलवावी. ती बैठक मुंबईत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज 

“शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही” 

“भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही, म्हणून मनसे त्यांची बी टीम बनलीये” 

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही” 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी