शरद पवारांनी राज्य सरकारला फटकारलं, म्हणाले…

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 आमदारांना मुंबईत मोफत घरे देण्याची घोषणा केली होती. आमदारांना घरे देण्याचा निर्णयावर अनेक स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आमदारांना घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझं वैयक्तिक मत आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांचा आमदारांना मोफत घरे देण्यास विरोध असून लवकरचं पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गृहनिर्माण योजनेमध्ये कोटा ठरवून आमदारांना घरे देण्यात यावीत, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

शरद पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या टीककडे लक्ष्य देत नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

आमदारांच्या मोफत घरांवरून टीका होत असून सरकारने निर्णय मागे घ्यावा, अशीदेखील मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घरे केवळ एमएमआरडीए क्षेत्राबाहेरील आमदारांसाठीचं असल्याचं म्हटलं आहे.

मुंबईत राहणाऱ्या आमदारांना ही घरे मिळणार नाहीत. तसेच ही घरे मोफत नसून घरांची जी काही किंमत आहे ती आमदारांना द्यावी लागणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील अनेक आमदारांकडे कोट्यावधींची संपत्ती असताना घरे कशासाठी?, सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष्य द्यायला हवं, अशी चर्चा आहे. आता शरद पवारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव 

घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय