शरद पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, समोर आला हा अहवाल….

अहमदनगर | महाविकास आघाडीचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकमधील घरात काम करणाऱ्या दोघांना तर त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली.

शरद पवार यांची कोरोना अँटीजन तपासणी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून ते एकदम व्यवस्थित असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी सांगितलं.

जेव्हा शरद पवार बाहेर जात असतात तेव्हा सुरक्षा रक्षक त्यांच्याभोवती गर्दी होऊ न देण्यासाठी ते लोकांना दूर करत असतात. तेव्हाच या सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा लागण झाली असवाी, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शरद पवार हे राज्यातच नाही तर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे जेव्हा सिल्वर ओकवरील कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समजली असता सर्वांनी चिंता व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली- नरेंद्र मोदी

पद्मविभूषण प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचं निधन

रोहित पवार यांनी ‘या’ कारणावरून मानले नरेंद्र मोदींचे आभार

‘पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, सर्व काही सुरळीत होईल’; ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास

“आदित्य ठाकरे यांची निवड योग्यच, ते एक जिद्दी आणि सक्षम नेता आहेत”