‘सिल्वर ओक’वरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आली.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी देखील केली. त्यावेळी शरद पवार हाय हाय… अजित पवार हाय हाय, अशा घोषणा देखील दिल्या. त्यानंतर आज राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. अशातच शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

थोडी माहिती तुम्हाला कळल्यानंतर तातडीने भोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवलं, असं म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”

शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!

‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”

ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांच्या सिल्वर ओकवर चप्पल फेक

राज ठाकरेंच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर, म्हणाले…