शरद पवारांनीच राणे आणि भुजबळांना शिवसेेनेतून फोडलं- रामदास कदम

रत्नागिरी : विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.  रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणेंना शिवसेनेतून फोडण्यात शरद पवार यांचा हात आहे, असा  दावा केला आहे. 

नारायण राणे यांना शिवसेनेतून काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं, असा दावा कदम यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

नारायण राणे, शरद पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार बाबासाहेब कुपेकर यांची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती. मात्र अपेक्षित मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसच्या दरबारी गेले, असं रामदास कदम यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी सत्तेत असताना जे केलं तेच चित्र आता त्यांना पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं. भुजबळांना शिवसेनेतून फोडण्यामागे शरद पवार यांचाच हात होता. ज्यांनी बाळासाहेबांना दु:ख दिलं ते सर्व भुईसपाट होत आहेत, असं रामदास कदम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-