“शरद पवारांचं दिल्लीत नावही घेत नाहीत आणि दखलही घेत नाहीत”

मुंबई | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता कंबर कसायला सुरवात केली आहे. अशातच शरद पवार सध्या विदर्भातच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शरद पवारांनी केंद्रातील राजकारणाविषयी सुचक वक्तव्य केलं होतं.

विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. तर यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांचा नेमका कल कोणाकडे? आणि शरद पवार दिल्लीत नवा पर्याय उभा करण्याच्या तयारीत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विट करत निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

ज्यांना कधी 10 खासदार निवडून आणता आले नाहीत ते 300 खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला काय आव्हान देणार?, असा खोचक टोला निलेश राणेंनी पवारांना लगावला आहे.

पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राने 1 प्रश्न मार्गी लावलेला दाखवा, असं खुल्लं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिलं आहे.

शरद पवार सध्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोंदींविरोधात पर्याय देणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

मोदींविरूद्ध नेतृत्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करतील की आणखी कोणता नेता हा प्रश्न नसून सध्या मोदींविरूद्ध पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी मांडलं होतं.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर देखील शरद पवारांनी भाष्य केलं होतं. नागपूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढली तर योग्य होईल, असं शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान, आता निलेश राणे यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी याला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आम्ही बारामतीत गेलो तर…’; नाना पटोलेंचं शरद पवारांना थेट आव्हान

अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं” 

  लस न घेणारे इंदुरीकरच आता सांगणार लस घ्या