पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…

मुंबई | दोन वर्षांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. दोन महिन्याहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. (Morning swearing in Ajit Pawar Devendra Fadnavis)

शिवसेना आणि भाजपमधील संबंध दुरावल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. याच घटनेवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाठवलं असं म्हणतात. मात्र, मी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार (Ajit pawar) यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवारांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी सरकार स्थापनेबाबत मला बोलायचं नाही. मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळेस बोलेन, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पक्षातील जेष्ठ व्यक्ती एकदा बोलल्यावर मी त्यावर काही बोलणार नसल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर देखील भाष्य केलं आहे.

दरम्यान, सध्या कोरोनाचे रूग्णसंख्या वाढत आहे. सध्या थंडी वाढतीये. त्यामुळे कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आता कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण

“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”