मुंबई | देशात एवढी महागाई वाढलीये. ती केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्राला दिला आहे.
शरद पवार यांनी सह्याद्री विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे नेहमी तारखा, वेळ देतात हे आम्ही ऐकत आलो आहोत, तसेच पाहत आलो आहोत, त्यामुळे आम्ही फक्त त्यांना ‘एन्जॉय’ करतो, असा टोला पवारांनी लगावला आहे. स
ज्यांना महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास माहिती नाही, असे लोक शांततेत राज्य चालत असताना नवीन प्रश्न निर्माण करत आहेत, त्यांचा आम्ही निषेधच करतो, असंही पवारांनी यावेळी म्हटलंय.
दरम्यान, राज्य आणि देशात सध्या व्यक्तिगत संघर्षांचे काम केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यामध्ये मतभेद होते, पण त्यात व्यक्तिगत संघर्ष कधीही नव्हता, असंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय
“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते”
जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं
“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो”