पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…

नाशिक | अलीकडे महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भारतीय जनता पार्टीत कित्येक दशकं काम करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. खडसेंनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू होत्या. पंकजा मुंडे यांनी या चर्चांना साफ नकार दिला होता. मात्र, पंकजा मुंडे यांच्या एका ट्वीटनं त्यांच्या पक्षांतराचा चर्चांना पुन्हा तोंड फुटलं आहे.

मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या प्रश्नांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टीट्युट येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट करत शरद पवारांना सलाम ठोकला. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्या पक्षांतराविषयी पुन्हा चर्चा चालू झाल्या. अशातच आता शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्वीटरवरून शरद पवार यांच्या केलेल्या स्तुतीबद्दल पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना पंकजा मुंडेंच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे देखील अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवारांना केलेला सलाम आणि त्यानंतर पवारांनी पंकजा मुंडे यांचं केलेलं कौतुक यामुळे येत्या दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप तर पाहायला मिळणार नाही ना?, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दरम्यान,  शरद पवार यांनी यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं तीन चाकी सरकार असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेना स्वबळावर भगवा झेंडा फडकवणार, असं नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरून पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शरद पवार यांनी शिवसेनेचे कान उपटले आहेत.

शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार असं शिवसेनेचे नेते शिवसैनिकांना सांगत असतील. मात्र, गेल्या 30 वर्षांपासून मी सतत हे ऐकत आलो आहे, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

यावेळी शरद पवार यांनी कांदा व्यापारी, शेतकरी आणि बाजार समितीच्या संचालकांशी देखील चर्चा केली. कांदा प्रश्नावर लवकरात लवकर केंद्र सरकारनं तोडगा काढावा, अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…

मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवरून महाराष्ट्र सरकारमध्ये चुरस; ‘ही’ नावं चर्चेत

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?

बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार