मुंबई | मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आणि वक्ते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून चर्चेत आणि वादात असतात. आता त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आणि टीका काँग्रेसच्या एका महिला नेत्याने केले आहेत.
शरद पोंक्षे हा आतंकवादी आणि नथुराम गोडसेची (Nathuram Godse) औलाद आहे. हिंदुंमध्ये नपुंसकता आल्याचे तो म्हणत आहे. पण मी याचा करेक्ट कार्यक्रम लावणार, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि महिलाप्रदेशाध्यक्षा संगीता तिवारी (Sangeeta Tiwari) यांनी दिला आहे.
शरद पोंक्षे हे काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हिंदू समाज अहिंसक होता. तो नपुंसक केव्हा झाला, ते कळले नाही, असे पोंक्षे बोलले होते.
रक्त न सांडता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हे खरे आहे. पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे. त्यांचा हा घोर अपमान आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले होते.
त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्याचमुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संगीता तिवारी यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली.
शरद पोंक्षे नावाचा कुणीतरी एक अभिनेता आहे. तो आता स्वत:ला मोठा नेता समजू लागला आहे. पण तो नेता नाही, तर एक आतंकवादी आहे. नथुरामची औलाद आहे. हा भाषणात सांगतोय अहिंसेचे डोस देऊन हिंदुंमध्ये नपुंसकता आली आहे, असे तिवारी म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोकांनी सावरकरांना (V. D. Savarkar) घाबरले पाहिजे. जर सावरकरवादी येताना पाहिला, तर लोकांना भिती वाटली पाहिजे. लोक आपल्याला घाबरले पाहिजेत, असे पोंक्षे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –
‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
हाच तुमचा अमृतमहोत्सव आहे का? असादुद्दीन ओवेसींचे केंद्र सरकारवर आरोप
“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे
“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर
देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप