मुंबई | विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने 11 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक आणि देशभरात 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय.
या चित्रपटावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतीये.
ज्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल. हे लक्षात ठेवा, असं शरद पोंक्षेंनी म्हटलं आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला.
कमी बजेट आणि मोजकं प्रमोशन करूनसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली, याचं काहीजण कौतुक करत आहेत.
दरम्यान,1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
Corona Restriction: मोठी बातमी! केंद्राने कोरोना निर्बंध हटवले; फक्त ‘या’ 2 गोष्टी पाळा
Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल
एसटी कर्मचाऱ्यांना धक्का! मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
“उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?”
Russia Ukraine War: नको तेच झालं! रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर, आता…