सोलापूर | अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता पोंक्षे यांनी पलटी मारली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं मी म्हणालोच नाही, असं म्हणत पोंक्षेनी कोलांटउडी मारली आहे. मात्र, काहींनी जाणीवपूर्वक आपल्या आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष वाढेल अशा पद्धतीने बातम्या दिल्या असं ते म्हणाले आहेत. ते सोलापूर येथे बोलत होते.
अशा बातम्या जेव्हा चर्चेत येतात तेव्हा लोक मला दुसरी बाजू न विचारताच प्रतिक्रिया देतात हे खूप दुखद आहे. हरी नरके यांनी किमान एकवेळ तरी मला फोन करु विचारायला हवं होतं, असं ते म्हणाले आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रति मला आदर असून सावरकरांच्या बद्दलही आहे. ही महान माणसं आहेत. त्यांच्यावर टीका करणारा मी कोण?, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त 1 कोटी???- निलेश राणे
-“दिल्लीतील दंगलीमागे RSS आणि भाजपचा हात”
-‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका