हात लावायचा नाय मला! महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदार भिडले!

जुन्नर | शिरूर मतदारसंघातील शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी हा वाद सर्वांना माहिती आहे. वेळोवेळी दोन्ही पक्षातील वाद प्रकर्षाने समोर येत असतो. अशातच आता मनसेचे माजी आमदार आणि नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनवणे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यात भर कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.

जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर-2 गावात रस्त्याच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना शरद सोनवणे आणि अतुल बेनके यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं.

अप्रूवलची तारीख मला पाहिजे, असं म्हणत शरद सोनवणे यांनी अतुल बेनके यांच्या हाताला हात लावला होता. त्यानंतर अतुल बेनके आक्रमक झाले आणि मला हात लावायचा नाय असं म्हणाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता.

त्यानंतर हात खाली करा, असं अतुल बेनके म्हणाले. त्यानंतर तुम्ही माझ्या शेजारी का बसला?, असं प्रत्युत्तर शरद सोनवणे यांनी दिलं. तुम्ही कशाला मग चर्चा तरी करता, असं म्हणत कार्यक्रमातील वातावरण चांगलंच तापलं होतं.

आचारसंहिता लागल्यामुळे काम झालं नाही. त्यावेळी अप्रूवल देखील भेटलं नाही. त्यानंतर निवडणुका लागल्या. निवडणुकीत पराभव माझा झाला, त्याआधी या रस्त्याची आखणी झाली होती, असं शरद सोनवणे म्हणाले आहेत.

मला उद्घाटनाची काम हौस नाही. खुर्ची गेली पण आम्ही बेअक्कल नाही. आपले कर्तृत्व किती आपण बोलतो किती, असा टोला देखील शरद सोनवणे यांनी बेनके लगावला आहे.

तुम्हाला कोण विचारतं, असं शरद सोनवणे म्हणाले. त्यावरून देखील पुन्हा वाद पेटला. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोघांना शांत करत मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं आणि दोघांनी आपापली बाजू मांडली.

सरकारने कामं रद्द केली होती, पण मी कामं कमी केली नाही. मला राग असता, द्वेष असता तर मी हा रस्ता केलाच नसता. हसन मुश्रीफ यांच्या काळात हे काम करण्यात आलं होतं. त्याच्या खात्याचं हे काम होतं, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.

दरम्यान, अखेर उपस्थितांनी दोन्ही आमदारांमधील तो वाद सोडवला आणि तो कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमात झालेल्या वादामुळे शिरूरमधील सेना विरूद्ध राष्ट्रवादी वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

आरोग्यमंत्र्यानी बुस्टर डोसविषयी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

 ‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक