Share Market l शेअर बाजारात मोठी वाढ! पाहा आजच मार्केट कस असेल

Share Market l आज शेअर बाजारात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या काही मिनिटांतच BSE सेन्सेक्स 72,209 वर आला, म्हणजेच 72 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीने 21873 ची पातळी ओलांडली आहे. बँक निफ्टीने 427.25 अंकांची किंवा 0.93 टक्क्यांची उसळी घेत 46,615 चा स्तर गाठला आहे.

BSE सेन्सेक्स आज 332.27 अंकांच्या किंवा 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 71,977 च्या पातळीवर उघडला आहे. NSE चा निफ्टी 115.30 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 21,812.75 वर उघडला आणि 21800 चा टप्पा पार केला आहे.

Share Market l सेन्सेक्स शेअर्सची स्थिती काय? :

आज सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी फक्त मारुतीचा शेअर लाल रंगात दिसत आहे. याशिवाय उर्वरित 29 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. सर्वाधिक लाभधारकांमध्ये पॉवर ग्रिड 2.99 टक्के आणि इन्फोसिस 2.03 टक्के वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 1.85 टक्के आणि टीसीएस 1.73 टक्क्यांहुन वर आहे. ICICI बँक 1.74 टक्क्यांच्या वाढीसह आणि टाटा स्टील 1.67 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

निफ्टी शेअर्सची स्थिती काय? :

निफ्टी शेअर्स मधील 50 पैकी 45 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 5 शेअर्स घसरत आहेत. 50 पैकी जे पाच समभाग घसरत आहेत त्यापैकी आयशर मोटर्स 2 टक्क्यांनी आणि मारुतीचा शेअर 0.88 टक्क्यांनी घसरला आहे. HDFC लाइफ 0.44 टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये अदानी पोर्ट्स 5.21 टक्के, बीपीसीएल 4.15 टक्के आणि पॉवर ग्रिड 2.86 टक्क्यांनी वर आहेत. Hero MotoCorp 2.67 टक्के व Infosys 2.24 टक्क्यांनी वाढून मजबूत स्थितीत दिसत असल्याचे दिसत आहे.

Share Market l बँक निफ्टीमध्ये जोरदार वाढ :

बँक निफ्टीमध्ये उपस्थित असलेले सर्व 12 समभाग आज वाढीसह व्यवहार करत आहेत आणि विशेषत: पीएसयू बँक समभागांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. बँक निफ्टीचा टॉप गेनर पीएनबी आहे जो सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे. ICICI बँक 1.9 टक्के आणि बंधन बँक 1.4 टक्के वाढ दर्शवत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँकही वाढले आहेत.

News Title : Today Share Market

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope l आजचे राशिभविष्य; या राशीचे व्यक्ती राजकीय क्षेत्रात आघाडी घेतील

MS Dhoni ED l IPL 2024 पूर्वी MS धोनीला बसला मोठा धक्का; त्या कंपनीवर ED चा छापा

Agriculture Budget 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? दुग्धोत्पादकांपासून मिळालं बरचं काही

Why budget briefcase is red l अर्थसंकल्प लाल कापड किंवा लाल सूटकेसमध्ये का आणला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Budget 2024 LIVE l अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल?