‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी

मुंबई | टाटा एलेक्‍सी शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना सुमारे 220 टक्के परतावा दिला आहे. टाटा एलेक्‍सी शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिल्यास दिसून येते की या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअरधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

गेल्या 13 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरून 8,850 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत सुमारे 20,700 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 6565 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे. तर वार्षिक जवळपास 50 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या एका वर्षात, टाटा समूहाचा हा शेअर सुमारे 2775 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो या कालावधीत सुमारे 220 टक्क्यांनी वाढला आहे.

इतकेच नाही तर गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक शोस्टॉपर राहिला आहे कारण गेल्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी Tata Elxsi चे शेअर्स गेल्या 10 वर्षांत सुमारे 100 रुपयांवरून 8850 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

या कालावधीत सुमारे 8,850 पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 13 वर्षांत, टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 42.48 रुपयांवरुन (NSE 2 एप्रिल 2009 रोजी बंद किंमत) आज 8,850 रुपयांवर पोहोचला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी टाटा समूहाच्या या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.53 लाख झाले असते.

महत्त्वाच्या बातम्या-

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

मोठी बातमी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्याचा कार्यक्रम होणार?

Anil Parab: “आता पुढचा नंबर अनिल परबांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी”

Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं

“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”