नवी दिल्ली | गेल्या काही काळापासून शेअर मार्केटमधील चढ-उताराचा अनेकांना फायदा होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न दिला आहे.
आपल्याकडील रक्कम योग्य वेळी चांगल्या कंपनीच्या शेअर्ससाठी गुंतवल्यास त्याचा फायदा होत असल्याचं दिसत आहे. परिणामी मार्केटकडं वळणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
फेविकाॅल आणि फेविक्विकचा वापर हा जोडण्यासाठी केला जातो. अगदी नावाप्रमाणंच कंपनीच्या शेअर्सनं ग्राहकांना मोठा रिटर्न दिला आहे.
पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. परिणामी याचा फायदा थेट गुंतवणुकदारांना होत आहे.
27 मार्च 2009 मध्ये या कंपनीचा शेअर फक्त 49.98 रूपयांना होता. 2022 मध्ये सध्या तोच शेअर 2423.65 रूपयांवर पोहोचला आहे.
एखाद्यानं जर 2009 मध्ये 2 हजार 382 शेअर्स घेतले असते तर आज त्याला तब्बल 57.85 लाख रूपये मिळाले असते. इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा सध्या या शेअर्सनं गुंतवणुकदारांना दिला आहे.
1996 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव फक्त 7 रूपये 88 पैसे होता. तेव्हा जर एखाद्यानं 1 लाखांचे शेअर्स घेतले असते तर त्याला आज 3 कोटी रूपये मिळाले असते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘इतक्या’ रुपयांनी महागलं पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
‘8 वर्ष देश चालवल्यानंतर पंतप्रधानांना…’; केजरीवालांनी भाजपला झाप झाप झापलं
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”