मुंबई | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असतं.
या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. मात्र अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
रघुवीर सिंथेटिक्स (Raghuvir Synthetics) हा असाच एक स्टॉक (Stock) आहे. रघुवीर सिंथेटिक्सच्या (Raghuvir Synthetics Share Price) या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात शेअरधारकांना 2,455% रिटर्न दिला आहे.
हा पेनी स्टॉक यावर्षी 4 जून 2021 रोजी 19.33 रुपयांवर होता. सोमवारी या स्टॉकची किंमत बीएसईवर 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर अर्थात 494.05 रुपयांवर पोहोचली होती.
एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते आज 25.55 लाख रुपये झाले आहेत. गेल्या 21 सत्रांमध्ये स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 177.79% ची तेजी आली आहे. हा शेअर 4.99% वाढीसह 494.05 रुपयांवर उघडला आहे.
दरम्यान, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.
पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर
Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा
“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत”
‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत