Share Market: टाटा ग्रुपच्या ‘हा’ multibagger stock आतापर्यंतच्या सर्वोच्च शिखरावर, गुंतवणूकदार मालामाल!

मुंबई |  सध्या शेअर बाजारात (Share Market) मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळत आहेत. बाजारातील घडामोडींचा फायदा काही कंपनींच्या शेअर्स धारकांना होताना दिसत आहे.

टाटा एलेक्सीच्या (Tata Alexsi) शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरनं तब्बल 235.12 टक्के रिटर्न दिला आहे.

30 मार्च 2021 रोजी कंपनीचा शेअर एनएसईमध्ये 2,688.60 रूपयांना होता. सध्या शेअरची किंमत 9,010 रूपयांवर पोहोचली आहे.

2022 वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर तब्बल 52 टक्के वाढला. परिणामी गुंतवणुकदारांना प्रचंड मोठा नफा झाला आहे. आतापर्यंत 25, 642 टक्के रिटर्न या शेअरनं दिले आहेत.

टाटा एलेक्सीचा शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी आकड्यावर गेला आहे. 9,090 रूपयांवर गेलेला शेअर्स आता परत 9,010 रूपयांवर पोहोचला आहे. परिणामी अनेकजण या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

1999 मध्ये टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या शेअरचा भावा फक्त 35 रूपये होता. त्यानंतर पहिल्यांदा या कंपनीच्या शेअरनं 300 रूपयांचा आकडा 2014 मध्ये पार केला.

सध्या इतक्या झपाट्यानं या शेअर्सचा भाव वाढत असल्यानं गुंतवणुकदारांसाठी फायद्याचा ठरत आहे. परिणामी गुंतवणूक देखील वाढत आहे.

दरम्यान, टाटा कंपनीच्या अन्य शेअर्समध्ये देखील सातत्यानं वाढ होत असताना आता टाटा एलेक्सी इतर कंपन्यांसोबत स्पर्धा करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?”

 अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”