वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त केली ‘ही’ इच्छा, म्हणाला…

मुंबई| बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करताना पहायला मिळतो.

चाहते अद्याप त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला विसरलेले नाहीत. इरफानचा मुलगा बाबिल आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बाबिल खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच बाबिलने सोशल मीडियावर आपल्या वडीलांचा आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट केली आहे. या फोटोत इरफान आणि बिग बी एकमेकांची गळाभेट घेत आहेत.

बाबिलनं शेअर केलेला हा फोटो 2015 मधील ‘पिकू’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे.

बाबिलने या फोटोसह अगदी भावुक अशी पोस्टही केली आहे. बाबिल म्हणाला, “मी लगेच चिंताग्रस्त होतो आणि माझा राग व्यक्त करतो. पणविचार करतो की माझ्या बाबांचे चाहते दयाळू आणि सळसळत्या रक्ताचे आहेत. त्यामुळे तिरस्काराकडे कानाडोळा करू या.  मी आत्मविश्वासाने आणि धाडसाने त्या लायकीचा बनून दाखवेन की माझा बाबांच्या चाहत्यांना देखील माझ्यावर अभिमान वाटेल”

पुढे बाबिलनं आपल्याला एकदा अमिताभ यांच्यासोबत काम करायचं आहे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, बाबिलला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते आणि आता त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली असून अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला लाँच करणार आहे.

अलीकडेच बाबिलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या डायरीमध्ये इरफानने लेक बाबिल याच्यासाठी काही अभिनयाच्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत. लवकरच बाबिल बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. बाबिलने लंडनच्या फिल्म स्कूलमधून पदवी शिक्षणही घेतले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: चुरशीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी विजय

फेस सर्जरी करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात,…

‘….म्हणून दिखावा करण्याची काही गरज नाही’,…

पाकिस्तानी रॅपरनं आलिया भट्टवर बनवलं रॅप; रॅप ऐकून आलिया…

‘तीन मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा’,…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy