‘हा’ फोटो शेअर करत अभिनेता अंकुश चौधरीने हटके अंदाजात नागरिकांना केलं मास्क घालण्याचं आवाहन

मुंबई |  काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सध्या करोनाची दुसरी लाट सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे. याच दरम्यान आरोग्य यंत्रनेवर खूप मोठा ताण आल्याचे दिसून येतं आहे.

तसेच रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, बेडच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारने घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणी जाताना तोंडाला मास्क लावणे हे अत्यावश्यक आहे.

परंतू तरी देखील काही-काही लोक या नियमाचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी राजकीय नेते, उच्च अधिकारी मास्क घालायचे आवाहन करत आहेत. अशातच मराठी सिनेमासृष्टीचा अभिनेता अंकुश चौधरीनेही एका अनोख्या पद्धतीने नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केलं आहे.

अंकुशने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट ‘दुनियादारी’ या चित्रपटामधील अंकुशने साकारलेल्या भूमिकेचा उजव्या बाजूला फोटो आहे. तर डाव्या बाजूला अभिनेता स्वप्नील जोशीचा फोटो आहे.

दुनियादारी हा चित्रपट खूप हीट झाला होता. त्यातील तेरी मेरी यादी, भाड मे गई ‘दुनियादारी’ हा डायलॉग तर सगळ्याच्या तोंडातच बसला होता. यावेळी अंकुशने याच डायलॉगचा आधार घेत नागरिकांना मास्क घालायचे आवाहन केले आहे.

पोस्ट केलेेल्या फोटोमध्ये ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी!’ असं लिहिलं आहे. तसेच त्या फोटोवर खालच्या बाजूला ‘मी जबाबदार असा’ लॉगोही दिसत आहे.

अंकुशची ही पद्धत अनेकांना आवडली असून, हा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअरही केला आहे. तसेच या फोटोला आतापर्यंत 17 हजार लोकांनी लाईक केलं आहे. त्याचप्रमाणे या फोटोवर कमेंटचा वर्षावही होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करा…

‘या’मुळे बॉलिवूडची अभिनेत्री राधिका मदनने सोडला…

ऑनलाईन क्लास संपला मात्र कॅमेरा राहिला ऑन, त्यानंतर…

डॉक्टरचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान…

कौतुकास्पद! बायकोचे दागिने विकून पठ्ठ्यानं रिक्षाला बनवलं…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy