आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

बॉलिवूड अभिनेता आणि किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनची सुटका झाली आहे. शुक्रवारी न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला. क्रूझवरील पार्टीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेची आणि त्यानंतर आता त्याच्या सुटकेची सर्वत्र चर्चा आहे.

आर्यनची सुटका करण्यात आली त्यावेळी एक विचित्र प्रकार घडला आहे. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याची सुटका होणार होती, त्यामुळे चाहत्यांची तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती, या गर्दीत पाकिटमारांनी अनेकांचे खिशे साफ केल्याचं समोर आलं आहे.

ड्र’ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खानला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. शाहरुख खानचा मुलगाच या प्रकरणात अडकल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र एनसीबीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.

राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणातील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं, मात्र आर्यनचा तुरुंगातील मुक्काम लांबत चालला होता.

दरम्यान, शुक्रवारी अखेर आर्यनला जामीन मिळाला. त्याच्या जामिनाची बातमी समोर येताच शाहरुखच्या तसेच आर्यनच्या चाहत्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर एकच गर्दी केली होती. मात्र या गर्दीत पाकिटमारांनी चोऱ्या केल्याचं समोर आलंय.

आर्यनची तुरुंगातून सुटका झाली मात्र त्याच्या चाहत्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांनी १० जणांचे मोबाईल चोरल्याचं समोर आलं आहे.

आर्यनच्या सुटकेवेळी झालेली गर्दी पाहून पाकिटमारांनी चांगलीच संधी साधली. १० जणांना मात्र यावेळी तिथं उपस्थित राहणं महागात पडलं. मोबाईल चोरीला गेल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आर्यन खानची सुटका झाली त्यावेळी आपल्या मुलाला नेण्यासाठी शाहरुख खान देखील हजर होता. त्याला आर्थर रोड कारागृहातून थेट मन्नत बंगल्यावर नेण्यात आलं आहे.

आर्यन खान प्रकरणाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे, मात्र यावेळी झालेल्या मोबाईल चोरीचा मुद्दाही आता चांगलाच चर्चेत येताना दिसत आहे. या प्रकरणी आणखी कोणी तक्रार करण्यास पुढं येतं का याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे.

आर्यन खानच्या सुटकेवेळी आणखी काही जणांचे खिशे साफ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, किंवा आणखी काही जणांचे मोबाईल सुद्धा चोरीला गेले असण्याची शक्यता आहे. आणखी तक्रारी आल्यानंतर यासंदर्भात ठोस माहिती समोर येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया

गुंतवणूकदारांना मोठा झटका; सेन्सेक्समधील घसरणीमुळे इतके लाख कोटी गमावले

आर्यनला सोडवण्यासाठी जुही चावला धावली, अशी केली शाहरुखला मोठी मदत

आयपीएलच्या 15 व्या हंगामाची चाहूल; ‘हे’ चार संघ माजी खेळाडूंना कायम ठेवणार

मोठी बातमी! कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू

“बाळासाहेब ठाकरे नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, कोणावर अन्याय होणार नाही”

“मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झालीये”

‘राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?’; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचा दर