‘साने-मंजुळे’ हे कॉम्बिनेशन तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे; शशांकचा सुजय डहाकेवर निशाणा

मुंबई |   राष्ट्रीय पुरस्कार विजेता युवा दिग्दर्शक सुजय डहाके याच्या मराठी मालिका आणि अभिनेत्रीसंदर्भात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या वक्तव्यावर आता अनेक मराठी कलाकार बोलते होऊ लागले आहेत. अभिनेता शशांक केतकरने सुजय डहाकेच्या वक्तव्याप्रकरणी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास, असं म्हणत केतकरने टीका केली आहे. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? अशा शब्दात त्याने सुजय डहाकेला सुनावलं आहे.

कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे, असा सणसणीत टोलाही शशांकने सुजयला लगावला आहे.

शशांकने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नॉन ब्राह्मण अभिनेत्रींची यादी दिली असून या सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि त्यांना टॅलेंट मुळे कामं मिळाली आहेत. कोणतही चॅनल जात, धर्म बघून काम देत नाही तर टॅलेंट बघून काम देत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत नेहमी ब्राह्मण मुली दिसतात. इतर मुली का नाहीत? असा सवाल केसरीचा दिग्दर्शक सुजय डहाके याने एका मुलाखतीत केला होता. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार यावर व्यक्त होऊ लागले आहेत.

शशांक केतकरने लिहिलेली फेसबुक पोस्ट-

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

आजीबाईंची आईस्क्रीम संपेपर्यंत सोनालीने सांभाळली त्यांची परडी!

-केजरीवाल घाबरले?; घेतला होळी न खेळण्याचा निर्णय

-मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवारांची ग्वाही

-रामदेव बाबा कोरोनापासून वाचण्यासाठीचा देशी उपाय सांगताना म्हणतात…

-हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देणारा रितेश देशमुखचा टिक टाॅक व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!