‘हा केतकर रोज कांबळेच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा मला अभिमान’; सुजयवर टीकास्त्र

मुंबई |  मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत नेहमी ब्राह्मण मुली दिसतात. बहुजन समाजातील मुली का नाहीत? असा सवाल करत मराठी इंडस्ट्रीचं जातीयवादी रूप उलगडण्याचा किंवा त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेता युवा दिग्दर्शक सुजय डहाके याने एका मुलाखतीत केला होता. मात्र त्याचं वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मराठी कलाकारांनी त्याचं वक्तव्य कसं खोटं आहे ते दाखवून देण्यास सुरूवात केली असून सुजयच्या वक्तव्यावर ते तुटून पडले आहेत.

कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे, असा सणसणीत टोला शशांकने सुजयला लगावला आहे.

अभिनेता शशांक केतकरने खरमरीत फेसबुक पोस्ट लिहून सुजय डहाकेचा समाचार घेतला आहे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे, असा सल्लाही त्याने सुजयला दिला आहे.

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? अशा शब्दात त्याने सुजय डहाकेला सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘साने-मंजुळे’ हे कॉम्बिनेशन तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे; शशांकचा सुजय डहाकेवर निशाणा

आजीबाईंची आईस्क्रीम संपेपर्यंत सोनालीने सांभाळली त्यांची परडी!

-केजरीवाल घाबरले?; घेतला होळी न खेळण्याचा निर्णय

-मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवारांची ग्वाही

-रामदेव बाबा कोरोनापासून वाचण्यासाठीचा देशी उपाय सांगताना म्हणतात…