“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही”

मुंबई | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकसभेच्या सहा महिला खासदारांसोबतचा एक फोटो शशी थरूर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे हे ट्विट चर्चेत आले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये थरुर हे सहा महिला खासदारांसोबत दिसून येत आहेत.

फोटोमध्ये सर्वांत पुढे उभ्या असलेल्या माहिला खासदाराने हा सेल्फी फोटो काढल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत आहेत.

सुप्रिया सुळेंसोबतच पतियालाच्या खासदार परनित कौर, खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि डीएमकेच्या खासदार थामीझाची या दिसत आहेत.

या सर्वांना शशी थरुर यांनी टॅग केलं आहे. मात्र, हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कोण म्हणतं की लोकसभा (Loksabha) काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं थरूर म्हणाले. थरूर यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सुरु झालेल्या टीकेनंतर थरुर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सेल्फीची सगळी गोष्ट मोठ्या विनोदात करण्यात आली होती, असं शशी थरूर यांनी सांगितलं आहे.

त्यांनीच मला सांगितलं होतं की त्याच भावनेने ती पोस्ट करा. पण मी क्षमस्व आहे की काही लोक नाराज झाले आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी असलेल्या सौहार्दाच्या या सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मला आनंद झाला. इतकंच आहे, असं थरूर यांनी म्हटलंय.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं 

“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार” 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर 

संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी 

अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…