‘कौन जीता है तेरी ज़ुल्फ़ के सर होने तक’, शशी थरूर यांची शायराना अंदाजात टीका

नवी दिल्ली | देशवासियांचं लक्ष लागून राहिलेला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मांडला आहे. देशाच्या अर्थसंकल्पावर सितारमण यांनी तब्बल दीड तास भाषण केलं आहे.

आपल्या अर्थसकल्पाच्या मांडणीत अर्थमंत्र्यांनी देशात येत्या काळात किती गुंतवणूक होणार आणि किती काम केलं जाणार यावर भाष्य केलं आहे. सरकारच्या या अर्थसंकल्पावर आता राजकीय चर्चा रंगत आहेत.

काॅंग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सध्या थरूर यांची शायराना अंदाजातली ही टीका सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन पुढील 25 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट असे केले आहे. सरकारने पुढील 25 वर्षांना ‘अमृत काळ’ असे संबोधले आहे. अर्थसंकल्पाबाबत असे म्हटले आहे की, तो पुढील 25 वर्षांत आर्थिक सुधारणांचा आधार ठरेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘अमृत काल’चा उल्लेख केल्यानंतर आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यावर खिल्ली उडवली आहे. उर्दूतील प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांनी लिहिलेल्या ओळी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांनी ट्विटरवर लिहिलं, “आह को चाहिए इक उम्र असर होने तक कौन जीता है तेरी ज़ुल्फ़ के सर होने तक?”, असं थरूर म्हणाले आहेत. याशिवाय काँग्रेस नेत्याने आपल्या ट्विटमध्ये हॅशटॅग देखील वापरला आहे.

शशी थरूर यांच्या या ट्विटनंतर भाजप आणि काॅंग्रेसमधील वाद चांगलाच वाढणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, थरूर यांना आपल्या खास शैलीसाठी राजकारणात ओळखलं जातं. थरूर यांनी अशी टीका केल्यानं वादाला सुरूवात झाली आहे.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या – 

 काॅमेडी किंग कपिलचा मोठा खुलासा! तब्बल 20 वर्षानंतर म्हणाला, “होय आम्हीच तुमच्या घरातील…”

“नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही”; अनिल परब यांचा दावा

 “कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, हिंदुस्थानी भाऊवर रुपाली पाटील कडाडल्या

रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची