नवी दिल्ली | काँग्रेस पक्षात सध्या नवीन अध्यक्ष नेमण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी ऑक्टोंबरमध्ये निवडणुका देखील होणार आहेत. त्यासाठी निवडणुकीला अनेकजण उत्सुक असल्याचे बोलले जाते आहे.
काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे देखील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविली जाते. त्यावर थरुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या तीन आठवड्यात सर्व काही स्पष्ट होईल. तेव्हाच मी प्रतिक्रिया देऊ शकेन. मी निवडणूक लढणार की नाही, ते आता सांगू शकत नाही. मात्र, लोकशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या पक्षात निवडणूक नेहमीच चांगली असते, असे थरुर म्हणाले.
यावेळी गांधी कुटुंबातील तीन लोक निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर थरुर म्हणाले. त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणूक लढवणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष असणे हे पक्षाच्या हिताचे आहे. नवीन अध्यक्ष पक्षाला नवसंजीवनी देतील, ज्याची काँग्रेसला नितांत गरज आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही निवडणूक लढवू शकतो, असे शशी थरुर म्हणाले.
काँग्रेसने भारत जोडो (Bharat Jodo) प्रचार यात्रा सुरु केली आहे. थरुर भारत जो़डो यात्रेच्या निमित्ताने तिरुअनंतपूरमला (Thiruvananthapuram) आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या –
“ईडीच्या भितीने राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, आणि…”; किशोरी पेडणेकरांची मोठी टीका
झारखंडचे मुख्यमंत्री आणि आमदार छत्तीसगढला अज्ञातस्थळी गेले; सांगितले ‘हे’ कारण
‘पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल
अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर