नवी दिल्ली | काँग्रेस (INC) पक्षात सध्या अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अनेकजन उत्सुक होते. कित्येकांनी तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच अध्यक्ष व्हावे, अशी भूमिका घेतली होती.
अखेर अध्यक्षपदाचे उमेदवार नक्की करण्यात आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यात चूरस होणार आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या निवडणुकीवर भाष्य केले आहे. एआयसीसी (AICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असा दावा थरुर यांनी केला.
राजस्थानचे मुख्यमंत्री हे सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांना पक्षाचे सुप्रिमो निवडणुकीत खेचत आहेत, तर त्यांच्या पक्षातील नव्वद आमदार तुम्ही जावू नका, म्हणून हातात राजीनामे धरुन बसले आहेत.
शशी थरुर यांनी आज केरळमध्ये पलक्कड येथील पट्टांबी येथे भारत जोडो यात्रेत सामील होत राहुल गांधी यांची भेट घेतली. मात्र त्यांनी या भेटीला केवळ शिष्टाचाराचे नाव दिले आहे.
याचबरोबर मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला दिसेल. मला अनेक राज्यांतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा दावा शशी थरुर यांनी बोलताना केला.
शशी थरुर यांनी काँग्रेस कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस कुटुंबाचा पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका’
‘या’ योजनेत महिन्याला 95 रुपये भरा आणि व्हा लखपती
‘सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील सभेत गोंधळ’
राजस्थानात 90 आमदारांनी काँग्रेसला राजीनाम्याची धमकी दिली; केली ‘ही’ मोठी मागणी
रायगडावर शिवाजी महारांच्या समाधीस्थळी पिंडदानाचा प्रकार उघड; व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत