Top news महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी अग्रस्थानी आहे. तसंच त्यांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद देखील मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या चर्चांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

माझं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आहे, हे खरं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी मी कोणत्याही प्रकारे इच्छुक नाही. तसंच या चर्चेमध्ये कोणत्याही प्रकराचं तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

मी राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माझी पक्षावर निष्ठा आहे. पण उमेदवारी द्यायची की नाही, हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. जर उमेदवारी दिली तर लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. आजवर जसं लोकांसाठी काम केलं तसं काम करेन, असं शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांची घोषणा काल केली आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, रूपाली चाकणकर तसंच अमोल मिटकरी यांचं नाव चर्चेत आहे. पक्ष कोणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

-“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”

-भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!