“राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार”

मुंबई | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

माझ्या पराभवाला शिवेंद्रराजेही भोसले जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे. ऐकलं नाहीतर तर माझ्या कारखान्याला ऊस नेऊ देणार नाही, असं सागंण्यात आल्याचा आरोपही शिंदे यांनी केलाय.

शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं आश्वासन देत राजकारण केलं गेलं. पहिल्यांदाच सांगितलं असतं की माझ्या कार्यकर्त्यांचं ऐकणार आहे तर मला निर्णय घेता आला असता, असं शिंदे म्हणालेत.

मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावं, असं शशिकांत म्हणाले.

माझ्या मनात कोनाविषयी पाप नाही मला पक्षाने सर्व काही दिलंय. सहकार पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार निवडले होते पण सहकार मधील उमेदवार का पडले हे पॅनेल प्रमुखांनी बोलणं गरजेचं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.

शिवाजीराव महाडिक आणि नंदकुमार मोरे का पडले याची चर्चा झाली पाहिजे. मी सरळ मनाचा नेता आहे मनात एक तोंडात एक अशी माझी वृत्ती नाही, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

मी शेवट पर्यन्त पक्षाचा पॅनेलच्या निर्णयाच्या बाहेर आलो नाही हिच माझी चूक झाली असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला. ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सदाभाऊ पाया पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…” 

मोठी बातमी! नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा जोरदार झटका 

गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले… 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय” 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे