“साताऱ्यात शरद पवारांना बिनविरोध करा अन्…”

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता साताऱ्यात उमेदवारीवरुन चर्चा सुरु आहे. यादरम्यान उदयनराजे भोसले यांनी भावूक होत जर शरद पवार निवडणुकीत उभे राहणार असतील तर उमेदवारी अर्ज भरणार नाही असं विधान केलं त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

उदयनराजेंना असं वाटत असेल तर शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्यावं असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. 

शरद पवारांसोबत उदयनराजेंनी कायम राहावं ही आमची तळमळ होती, पण दुर्दैवाने भाजपने जी खेळी केली त्या परिस्थितीतून उदयनराजेंवर तणाव होता त्यातून भाजपत प्रवेश केला असावा, असं शशिकांत शिंदे यांनी म्हणाले.

सातारा उमेदवारीबाबत अद्याप पक्षाचा कोणताही निर्णय नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी शरद पवारच निर्णय घेतील. बिनविरोध होणार असेल तर शरद पवारांना उमेदवारीसाठी आग्रह धरू. प्रेम, आपुलकीपणा, आदर उदयनराजेंना दिला. भाजपाने उदयनराजेंना राज्यसभेवर घ्यावं, मंत्रिपदाचं आश्वासन दिलं ते पूर्ण करावं मग सर्व प्रश्च मिटतील, असा टोला शशिकांत शिंदे यांनी भाजपला लगावला आहे.

शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच, ते उभे राहणार असल्यास मी फॉर्म भरणार नाही, असं उदयनराजेंनी जाहीर केलं. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असं म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-