सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील (Nitin Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचा पत्ता कट झाला आहे. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची वर्णी लागली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरुन खोचक वक्तव्य केलं आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती, असं शशिकांत शिंदेंनी सांगितलं आहे.
माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावलाय.
माझ्या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याची दखल राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींना घ्यावी लागली. परंतु ते करत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या कामाचं कौतुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं आहे, असं शशिकांत शिंदे यांवी
आजपर्यंत या बँकेत शिवेंद्रराजे भोसलेंना जितका वेळ अध्यक्षपद दिलं तितका वेळ कुणाला मिळाला नसेल. त्यामुळं नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती.
सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट घेत शिवेंद्रराजे भोसले यांनी “बँकेत राजकारण नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केला” असं शरद पवार यांना संगितलं होतं. यावेळीही अध्यक्षपद मिळावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याचं बोललं जात होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका
आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर!
“कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा”