अन् उदयनराजे म्हणाले… सॉरी चुकलं माझं!

सातारा | काल मी आणि उदयनराजे भेटलो, तेव्हा सॉरी चुकलो असं ते दोनदा म्हणाले. त्यावर आधी मी काहीही प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळाने मी म्हणालो… तुम्ही स्वत:चही नुकसान करून घेतलं आणि माझंही नुकसान केलंत, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.

काल भिवडी गावात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी या दोघांची झालेली गळाभेट चांगलीच चर्चेत आली. मी उभा होतो त्यावेळी उदयनराजेंनी आले आणि मला मिठी मारली. यावेळी  सॉरी चुकलो, असं म्हणाल्याचा खुलासा शिंदेंनी केला आहे.

उदयनराजेंचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. अश्रू अनावर झाल्याच्या बातम्या आल्या, त्या साफ चुकीच्या आहेत. मी माझ्या पक्षाबाबतच्या भूमिकेवर ठाम आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

उदयनराजेंचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. कालपासून आलेल्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांच्यात आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-