सातारा | आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.
साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
आपण परिणामांची चिंता करत नाही, असं सांगताना ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शशिकांत म्हणाले.
भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला मागे 100 कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटतं ते 100 कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं शशिकांत शिंदे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”
“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”
आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर
“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”