पहिल्या नवऱ्याला एक कोटी तर दुसऱ्याला 45 लाखाचा गंडा घातला अन् परदेशात तिसऱ्या सोबतच तिचा संसार थाटला

रांची | झारखंड मधील चतरा येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तीन मुलांसोबत लग्न करत त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. प्रियांका कुमारी असं या मुलीचं नाव आहे.

प्रियंकाचा शादी डॉट कॉमच्या माध्यमातून सर्वप्रथम गिरीडीच्या निलय कुमारशी विवाह झाला. दोन वर्षानंतर या दोघांमध्ये सतत खटके उडू लागले. याच दरम्यान प्रियंकाने निलय कडून वेगवेगळी कारणे सांगून एक कोटी रुपये घेतले आणि फरार झाली.

काही काळाने प्रियंका पुन्हा शादी डॉट कॉमच्या माध्यमातून गुजरातमधील राजकोट येथे राहणाऱ्या अमित मोदी नावाच्या मुलाच्या संपर्कात आली आणि दोघांनी विवाह केला. लग्नाच्या काही दिवसानंतर पैश्याची चुनचून असल्याचं सांगत तिने कुटुंबियांकडून 40 ते 45 लाख रुपये लुटले आणि कामाचे कारण सांगून घरातून बाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही.

29 डिसेंबर 2018 रोजी प्रियंका पुण्यातील सुमित दशरथ पवारशी लग्न करून कॅलिफोर्नियाला गेली. सुमितच्या आईने प्रियंकाच्या मोबाईलवर तिचे अमितसोबत फोटो आणि कॉल पाहिले. सुमितच्या आईने अमितला कॉल केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. सुमितच्या आईने प्रियंका विरुद्ध पुण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेचे धागे दोरे झारखंडमधील चतरा जिल्ह्यात आढळून आले आहेत. पुणे पोलिसांनी चतरा पोलिसांना याप्रकरणी चौकशी करण्यास सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!

तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं