आई-वडिलांची मुलीच्या डोळ्यासमोरच हत्या; मुलीनं ‘ऑन द स्पॉट’ असा घेतला बदला!

काबूल | अफगाणिस्तानमधील घोर प्रांतात कमार गुल ही आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. कमारचे वडील गावचे सरपंच होते. कमारच्या आई-वडिलांची काही दहशतवाद्यांनी तिच्या समोर हत्त्या केली. याचाच सूड घेत कमारने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

गेल्या आठवड्यात कमारचे आई-वडील व ती घरात बसलेले होते. त्यावेळी अचानक काही दहशतवादी कमारच्या वडिलांचा शोध घेत त्यांच्या घरात घुसले. दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांना खेचतच घराबाहेर आणले.

दहशतवादी कमारच्या वडिलांना मारहाण करत आहेत हे पाहून कमारची आईमध्ये घुसली व त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्या दोघांना ही गोळ्या झाडत ठार केले. आपल्या डोळ्यांसमोर आई-वडिलांची हत्त्या झाल्याचं पाहून कमार प्रचंड संतापली. घरात सुरक्षेसाठी ठेवलेली बंदूक तिने उचलली आणि दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन दहशतवादी जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला.

जखमी अवस्थेत असलेल्या दहशतवाद्याने झालेली घटना इतर सहकाऱ्यांना जाऊन सांगितली. त्यानंतर काही दहशतवादी कमारच्या शोधात आले. मात्र सर्व ग्रामस्थ कमारच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी दहशतवाद्यांना हुसकावून लावले.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुणेकरांनो सावध व्हा, पुण्याने गाठलेला हा आकडा आहे धक्कादायक!

नालायक पाकिस्तान!; भारत-चीन वादाचा फायदा घेत अशाप्रकारे करतोय कुरापती!

अण्णा हजारे पुन्हा उतरले मैदानात; महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा

संतापजनक! 11 महिने अल्पवयीन मुलीसोबत जे केलं ते ऐकून काळजाचा थरकाप होईल!

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!